शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 22:11 IST2023-12-12T22:10:33+5:302023-12-12T22:11:36+5:30
Shiv Sena MLA Disqualification Case : शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीनेच वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल
MLA Disqualification Case :शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात (MLA Disqualification Case) मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला आहे. आता अंतिम सुनावणी सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला असून, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार असून, उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.
दोन्ही गटांकडून आज उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि भरत गोगावलेंची साक्ष नोंदवली. आता 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार असून, सोमवारी अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.