शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 7:30 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.  

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखारी शब्दात टीका केली आहे. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वत:चं हित पाहाणाऱ्या अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल सामना संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असं म्हणावे लागेल, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, अजित पवार यांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच म्हणायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. कालच त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली. शिवसेनेच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणाले. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकावे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात. काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे. अजित पवार म्हणतात की, शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. मग काय हो अजितराव, तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? गांडूळ हा निदान शेतकऱ्यांचा मित्र तरी आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला. सत्तेत असताना काही केले नाही व विरोधी पक्षात असतानाही तोंडास बूच मारूनच बसले. शेतकऱ्यांच्या  कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असल्यापासूनच शिवसेना रान उठवीत आली व भाजप सत्तेवर आला तरी शिवसेनेने कर्जमुक्तीचा नारा सोडला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाज चढवून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शिवसेनेने करून घेतली आणि सत्तेत असून महाराष्ट्राच्या व जनतेच्या हितासाठी आवाज उठविण्याचे काम शिवसेनाच एका कर्तव्यभावनेने करीत असते. जेव्हा तुम्ही सलग १५ वर्षे

सत्तेत खुर्च्या उबवीत होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्रहिताचे काय दिवे लावले? जमीन घोटाळे व पाणी घोटाळे याशिवाय तुम्ही काय केलेत? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जलसंधारण घोटाळय़ाचे स्फोट केले गेले. तेव्हा ‘तो मी नव्हेच’चा आव आणून तुम्हालाही मंत्रिमंडळातून बाहेर पडता आले असते. पण दुतोंडी सापाच्याच अवलादीप्रमाणे काँग्रेजी चिखलात सत्ता उबवीत वळवळत राहिलात ना? आजही त्याच जलसंधारण भ्रष्टाचाराच्या चौकशीचा फास गळ्याभोवती आवळला जाण्याची भीती असल्यानेच काही कारण नसता शिवसेनेवर चिखलफेक करताय व दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मंत्रीपद गमावलेल्या खडसेंच्या पायाचे तीर्थ प्राशन करताय. आज महाराष्ट्रात सरकार शिवसेनेचे नाही. ते २०१९ साली नक्कीच येईल. तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनात ‘मूत्र’ कालवणाऱ्या भ्रष्ट छिंदम अवलादीच्या अजित पवारांची गय केली जाणार नाही. अजित पवारांसह त्यांच्या भ्रष्ट मित्रमंडळाची जागा भुजबळांबरोबर तुरुंगातच आहे. त्या भयानेच भाजपचे ‘बूट’ चाटीत हे महाशय शिवसेनेवर हल्ला करीत आहेत. अजित पवारांवर लिहिण्यासारखे प्रचंड आहे, पण त्या गटारास ‘सामना’त इतकी जागा देण्याची गरज नाही व तेवढी त्यांची लायकीही नाही. ज्या काँग्रेस पक्षाशी २०१४ साली निवडणूक युती तोडलीत त्याच काँग्रेसबरोबर अजित पवार पुन्हा बोहल्यावर का चढत आहेत? दुतोंडी गांडुळांनाच हे जमू शकेल. अजित पवार, स्वतःला सांभाळा. तुमच्या झोकांड्या जात आहेत. तुमचे नेतृत्वाचे विमान कधीच उडाले नव्हते. या विमानाची चाके जमिनीवरच आहेत, तुमचे डोके वेगळ्यास नशेने उडते आहे. डोके तपासून घ्या. तुमचा छिंदम झाला आहे!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस