शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रागगड गल्ली भागात शिवसेना भाजपा कार्यकर्ते भिडले

By admin | Updated: February 21, 2017 01:15 IST

ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या गटाकडून रात्री उशिरा प्रचार सुरु असून, ते लोकांना प्रलोभने दाखवित असल्याचा

 ठाणे, दि. 21 - ठाण्याचे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या गटाकडून रात्री उशिरा प्रचार सुरु असून, ते लोकांना प्रलोभने दाखवित असल्याचा आरोप भाजपचे नारायण पवार यांनी केला. याच कारणावरुन उभय गटांमध्ये बाचाबाची झाली. त्यातून दोन्ही गटातील जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी सौम्य लाठी हल्ला करावा लागल्याची घटना सोमवारी रात्री 10वा. च्या सुमारास घडली. अर्थात कोणाचीच तक्रार न आल्याने कोणाही विरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतांना शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते सोमवारी रात्री रायगड गल्लीत एकमेकांसमोर भिडले. विचारे हे आपल्या समर्थकांसह नारायण पवार यांच्या कार्यालयाजवळून जात होते. त्याचवेळी ते लोकांवर प्रभाव पाडीत असून त्यांना प्रलोभने दाखवित असल्याचा आरोप पवार यांनी केला. यातूनच उद्भवलेल्या वादातून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. दोन्ही गटांमध्ये तणाव वाढत असतांनाच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. औरंगाबाद राज्य राखीव पोलीस दलाच्या कुमकसह मोठा फौजफाटाही या ठिकाणी दाखल झाला. तरीही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी अखेर सौम्य लाठीहल्लाही पोलिसांना करावा लागल्यचे एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने सांगितले.दरम्यान, याबाबत रात्री उशिरा ठाण्याचे आमदार संजय केळकर हे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. कोणाही विरुद्ध तक्रार आली तर त्याची गय केली नसल्याचे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्ष्रक अनिल पोफळे यांनी सांगितले. दोन गटांमध्ये वाद उद्भवल्यानंतर पोलिसांनी आरडाओरडा करुन जमावाला पांगविल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले. घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून याठिकाणी राज्य राखीव दलांच्या तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात केला आहे.