Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:40 IST2026-02-19T08:38:56+5:302026-02-19T08:40:00+5:30
Shiv Jayanti Shivneri Fort Stampede: शिवजयंती सोहळ्यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

Shivneri Shiv Jayanti: शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवनेरीवर चेंगराचेंगरी, महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी
राज्यभरात आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. शिवछत्रपतींचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरही शिवजयंतीसाठी शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यादरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना घडली असून, यात अनेक शिवभक्त जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिवजयंती सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून शिवभक्त कालपासूनच मोठ्या प्रमाणावर शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले होते. यादरम्यान, मध्य रात्रीच्या सुमारास अंबरखान्याच्या खाली असलेल्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. येथील अरुंद वाटेवर हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिगडली. अरूंद वाद आणि मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी यामुळे येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेली पोलीस यंत्रणाही अपुरी पडली आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दीमुळे उडालेला गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळे लोकांमभे भीतीचं वातावरण निर्माण झालं. तसेच अनेकजण एकमेकांवर पडून चिरडले गेले.
या चेंगराचेंगरीमध्ये काही महिला आणि मुले जखमी झाली आहेत. जखमींना उपचारांसाठी जुन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या चेंगराचेंगरीत कुणालाही फार मोठी दुखापत झालेली नाही. तसेच डॉक्टर या जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.