उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेनं आखली रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 12:35 IST2022-02-14T12:33:19+5:302022-02-14T12:35:54+5:30
सध्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार उतरविले आहेत.

उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेनं आखली रणनीती
मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना देशभरातील लोकसभा निवडणुका लढविणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत. गोव्यानंतर आता लवकरच आदित्य ठाकरे यांच्यासोबत उत्तर प्रदेशला भेट देणार आहोत. तिथे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव सरकार स्थापन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लोकसभा निवडणूक लढवू, त्यासाठी तयारी सुरू झाली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सध्या उत्तर प्रदेश, गोव्यासह देशभरातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेनेने आपले उमेदवार उतरविले आहेत. अलीकडेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी गोव्याचा प्रचार दौरा केला होता.