Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: मोठी घडामोड! शिवसैनिकांच्या समोरून पोलिसांनी राणा दाम्पत्याला बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 17:55 IST2022-04-23T17:50:17+5:302022-04-23T17:55:04+5:30
Navneet Rana, Ravi Rana Detain By police: राणा यांनी वॉरंट दिल्याशिवाय आम्ही तुमच्यासोबत येणार नसल्याची भुमिका घेतली होती. मात्र त्यानंतर काही मिनिटांतच दोघेही पोलिसांसोबत खाली आले.

Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: मोठी घडामोड! शिवसैनिकांच्या समोरून पोलिसांनी राणा दाम्पत्याला बाहेर काढले
पाचशे शिवसैनिक आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले, तरी देखील आमच्यावर गुन्हा दाखल केला जातोय. आम्ही तुम्हाला सहकार्य केले. आम्ही एकही पाऊल बाहेर ठेवले नाही, संजय राऊतांच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल होत नाही, असे म्हणत पोलिसांसोबत जाण्यास नकार देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा यांना पोलिसांनी अखेर बाहेर काढले आहे.
Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: राणा दाम्पत्य भडकले! आमच्या घराबाहेर व्हा; नेण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची
मातोश्रीबाहेर किती शिवसैनिक जमले? राणे म्हणाले, मी मोजायला सांगितले; थेट आकडेच दिले
अखेर पोलिसांनी संतप्त शिवसैनिकांच्या समोरुनच राणा दाम्पत्याला बाहेर काढले. दोन गाड्या आणि रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांची साखळी करत राणा यांना नेण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी या गाड्यांवर चपला मारल्या, हातांचे बुक्के मारले. तरीही पोलिसांनी शिवसैनिकांच्या तावडीतून राणा दाम्पत्याला बाहेर काढत पोलीस ठाण्यात नेले.
यावेळी राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊनही आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. त्या आधी राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावेळी त्यांनी वॉरंट दिल्याशिवाय आम्ही तुमच्यासोबत येणार नसल्याची भुमिका घेतली होती. मात्र त्यानंतर काही मिनिटांतच दोघेही पोलिसांसोबत खाली आले.
पोलीस आम्हाला येऊन सांगत आहेत की आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आम्हाला गाडण्याचे म्हणणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा तसेच अनिल परबांवर गुन्हा दाखल करावा. आम्हाला वॉरंट दाखविल्याशिवाय आम्ही बाहेर येणार नाही, असे रवी राणा म्हणाले.