कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 15:53 IST2021-04-19T15:49:18+5:302021-04-19T15:53:12+5:30

remdesivir: माजी मंत्री आणि शिवसेना नेत्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.

shiv sena vijay shivtare claims that thackeray govt discrimination over remdesivir | कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

ठळक मुद्देशिवसेना नेत्याचा घरचा आहेरकोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवणमहाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका नाही - शिवतारे

मुंबई: रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, कोरोना लसींचा तुडवडा यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि दुसरीकडे त्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांकडून केला जात असतानाच आता माजी मंत्री आणि शिवसेना नेत्यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला असून, लसीकरण, रेमडेसिवीरबाबत भेदभाव सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (vijay shivtare claims that thackeray govt discrimination over remdesivir)

पुण्यातील पुरंदर जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबले असल्याचा दावा करत विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरुन आपण ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेटही घेतल्याची माहिती त्यांनी दिली. 

“त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही

महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर माझी नाराजी आहे. जिल्हाधिकारी, FDA यांच्या कारवाईवर संशय आहे. पुरंदर जिल्ह्यात १८०० रुग्ण असताना फक्त २२५ रेमडेसिवीर मिळाले आहेत. लसीकरणबाबतीतही आमच्यावर अन्याय झाला आहे. पुरंदर मध्ये जास्त धोका असतांना फक्त ३४ हजार लसीकरण झाले आहे. अन्य जिल्ह्यात मात्र दुपटीने लसीकरण झाले, असा दावा शिवतारे यांनी केला आहे. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण

कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार करत प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा दावाही शिवतारे यांनी केला. सम प्रमाणात सगळ्या गोष्टींचे वाटप करावं अशी मागणी करताना मला राजकारणावर बोलायचे नाही, असेही ते म्हणाले. यापूर्वी, राज्यातील भाजप नेत्यांसह केंद्रातील भाजप नेते पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकरदेखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल महाराष्ट्राची वकिली करायची सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवत आहेत. गोयल यांनी महाराष्ट्रावर टीका करण्यापेक्षा इथल्या मातीचे ऋण फेडले तर बरे होईल, असे प्रत्युत्तर बाळासाहेब थोरात यांनी पीयुष गोयल यांच्या टीकेला दिले. 
 

Web Title: shiv sena vijay shivtare claims that thackeray govt discrimination over remdesivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.