Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 10:41 IST2025-06-23T10:39:37+5:302025-06-23T10:41:24+5:30

Sanjay Lakhe Patil Resigns: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक तयारीत गुंतलेल्या शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray secretary Sanjay Lakhe Patil resigns from party | Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!

Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक तयारीत गुंतलेल्या शिवसेना उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे डॉ. संजय लाखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी आपला शब्द पाळला नाही, असा आक्षेप लाखे पाटील यांनी घेतला. जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु, शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याचे त्यांनी म्हटले.

संजय पाटील यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा हात सोडून उद्धव ठाकरेंच्या गटात सामील झाले. त्यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आले. संजय पाटील म्हणाले की, "मला विधानसभा निवडणुकीत सांगलीऐवजी जालना येथून तिकीट देऊ, असे अश्वासन देण्यात आले. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानी त्यांच्या वैयक्तिक अजेंडामुळे होऊ दिले नाही. जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले."

अंबादास दानवेंवर टीका करताना पाटील म्हणाले की, "मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते. अंबादास दानवे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत होते, तेव्हा मला दौऱ्यापासून दूर ठेवले. कुठलीही जबाबदारी दिली नाही. मुळात मला कामाची संधी दिली नाही. मला कसे दूर ठेवले जाईल, हेच पाहिले गेले. संघटनात्मक कामापासून मला सातत्याने वगळण्यात आले. त्यामुळेच यापुढे मी ठाकरे गटात काम न करण्याचे ठरवले आहे."

Web Title: Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray secretary Sanjay Lakhe Patil resigns from party