Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 20:05 IST2025-10-02T20:03:58+5:302025-10-02T20:05:45+5:30
Shiv Sena UBT Dasara Melava 2025 : "आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं ते, हे तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक होतं ते माझं नव्हतं."

Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
Uddhav Thackeray Dasara Melava Speech: आमचे हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायेत, मी बातमीच घेऊन आलोय, इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय, 'मोस्ट पॉप्यूलर सीएम अॅक्रॉस इंडिया' (भारतातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री). गेल्या दोन-तीन महिन्यांतलाच सर्व्हे आहे. यामुळे मी त्याचा कागदच घेऊन आलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हतं ते, ते तुमचं सहाय्य होतं. महाराष्ट्रातल्या जनतेचं कौतुक होतं ते, माझं नव्हतं, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण यादी वाचत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते शिवसेनेच्या (ठाकरे गट) दसरा मेळ्यावत मुंबई येथे शिवाजी पार्कवर बोलत होते.
पण आज हा जो सर्व्हे आला आहे, त्यात सर्वात लोकप्रिय उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, दुसऱ्या स्थानावर ममता बॅरर्जी, तिसऱ्या क्रमांकावर चंद्राबाबू, चौथ्या स्थानावर नीतीश कुमार, पाचव्या क्रमांकावर स्टॅलिन, सहाव्या क्रमांकावर पिनरई विजयन, या नंतर रेवंता रेड्डी, मोहन यादव, हेमंत्ता विस्वसरमा आणि दहाव्या क्रमांकावर आहेत आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नशीब 10 आले, नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते. आहो येणार कसे? सर्व बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत काय तुम्ही आजपर्यंत.
...पण त्यांना हात लावण्याची यांच्यात हिम्मत नाही -
आज एक बातमी आली, कुठल्या एका अधिकाऱ्याच्या कार्यालयावर धाड टाकली. अधिकाऱ्याला पकडलं रंगेहाथ. वसई विरार महापालिकेच्या आयुक्तालापकडलं होतं. अधिकारी पकडले जात आहेत. पण मंत्री, राजरोस खोलीमध्ये बॅगा उघड्या टाकून बिनधास्त बसले आहेत. पण यांची त्यांना हात लावण्याची हिम्मत होत नाही.
आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत... -
मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जात आहेत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्सबार काढले जात आहेत. पुरावे सादर केले, विधीमंडळात सादर केले, तरीही देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना समज देऊन सोडून देत आहेत. हे बरं नाही हा... पुढच्या वेळेला पुरावा दिसता कामा नये. हे तुमचं राज्य हा तुमचा कारभार? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.