"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 21:05 IST2025-10-02T21:05:07+5:302025-10-02T21:05:54+5:30
Shiv Sena UBT Dasara Melava 2025 : ठाकरे म्हणाले, "मला असं वाटतं की, कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रम्हदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही, झाला ब्रह्म राक्षस झाला आहे. मी ब्रह्मराक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे. सर्वांनी घरी जाताना गुगलवर या शब्दाचा अर्थ बघा."

"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Dasara Melava Speech : मोहन भागवत यांना मी सांगतो आहे की, भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटे..., आहो 100 वर्ष झाल्यानंतर (संघाला), तुम्हाला समाधान आहे का, की ज्या कामासाठी संघाने 100 वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का? असा सवाल करत, "की याचसाठी केला होता अट्टहास. ही सर्व विषारी फळं, त्या झाडाला लागली आहेत," असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते शिवसेनेच्या (ठाकरे गट) दसरा मेळ्यावत मुंबई येथे शिवाजी पार्कवर बोलत होते.
ठाकरे म्हणाले, "मला असं वाटतं की, कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रम्हदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही, झाला ब्रह्म राक्षस झाला आहे. मी ब्रह्मराक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरत आहे. सर्वांनी घरी जाताना गुगलवर या शब्दाचा अर्थ बघा."
"आमच्या अंगावर हिंदूत्व... हिंदूत्व... म्हणून येताना..., मोहन भागवत यांची काही वर्षांतील वाक्य आहेत..., असे म्हणत ठाकरे यांनी, एक बातमी वाचून दाखवली, त्यात मोहन भागवत यांनी हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने दिल्लीत काही मुस्लीम धर्मगुरुंशी बैठक केल्याचा उल्लेख होता. यानंतर मोहन भागवत यांनी हिंदूत्व सोडले, असे म्हणण्याची हिंमत आहे का तुमची? असा सवालही त्यांनी भाजपला केला.
यावेळी ठाकरे यांनी 2022 चीही एक बातमी वाचली. यात, मोहन भागवत यांनी एका मशिदीला भेट दिल्यानंतर, मुस्लीमांचे सर्वोच्च नेते उमर अहमद इलियासी, यांनी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला, असा दावा करण्यात आला. यावर, भारतातील मुस्लिमांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला, जा भाजप वाल्यांना जाऊन विचार, त्यांना हिंदूस्तानचे राष्ट्रपिता म्हणालेत की पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणाले? आमच्या अंगावर येता. असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
"मोहन भागवत म्हणाले आहेत, या देशात राहतो तो प्रत्येक जण हिंदू आहे. मग तुमचे हे चेले-चपाटे जे हिंदू-मुस्लीम, हिंदू-मुस्लीम करत आहेत... आम्ही जे सांगतोय, परत मी त्यावर ठाम आहोत. हा देश जो स्वतःचा मानतो, तो आमचा आहे," असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.