शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादीच्या पाचपैकी तीन जागांवर मविआने उभे केले उमेदवार; अडचणीत सापडले अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 14:46 IST

समाजवादी पक्षाने उमेदवार ठरवलेल्या पाच जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

Samajwadi Party : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हळूहळू वाढत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्वच पक्षांमध्ये जागा आणि उमेदवारांबाबत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीसोबत असलेल्या समाजवादी पक्षाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने महाराष्ट्रात समाजवादी पक्षाला सपशेल बाजूला केलं आहे.

जागावाटपाच्या बाबतीत, समाजवादी पक्षाने पाच जागांची मागणी केली होती. मात्र समाजवादीने दावा केलेल्या तीन जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करुन टाकली आहे. तीन जागांवर शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता समाजवादी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रात पाच जागा देण्याची मागणी केली होती. मात्र अबू आझमी यांनी मागितलेल्या पाचपैकी तीन जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने २६ ऑक्टोबर रोजी त्यांचे उमेदवार जाहीर केले. अबू आझमी यांनी धुळे शहर, भिवंडी पूर्व, मानखुर्द, भिवंडी पश्चिम आणि मालेगाव मध्य जागा मागितल्या होत्या.

रईस शेख हे भिवंडी पूर्वेतील सपाचे आमदार आहेत. मात्र शनिवारी शिवसेनेने धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर केली. तर काँग्रेसने मालेगाव मध्यमधून एजाज बेग आणि भिवंडी पश्चिममधून दयानंद मोतीराम चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली. तर मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून नवाब मलिक यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने आपल्याच जागेवर अबू आझमींच्या अडचणी वाढल्या आहेत.

यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. नवाब मलिक यांनी त्यांच्याविरोधात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांना उमेदवारी जाहीर केली नसली तरी मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर लढण्याचा निर्धार केला आहे. तीन जागांवर मित्रपक्षांनी समाजवादी पक्षाला बाजूला करत उमेदवारी जाहीर केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीने खेळलेल्या या खेळीमुळे अबू आझमी देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत. समाजवादी पक्षाने या जागांवर आपले उमेदवार आधीच जाहीर केले होते पण ठाकरे गट आणि काँग्रेसने जागावाटपात सपाला बाजूला केले. आता अबू आझमी यांनी पाच जागा न मिळाल्यास सर्व २५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Samajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस