शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 1:41 PM

देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले, असंही राऊत म्हणाले. 

ठळक मुद्देदेशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे : संजय राऊतलॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले, राऊत यांचं वक्तव्य

संजय राऊत यांनी बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही निशाणा साधला. "प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे," असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना टोला लगावला. माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रकाश जावडेकरांवरही टीका केली. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. परंतु राज्यातील जनतेचं म्हणणं असल्याचं सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?," असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देशातील परिस्थिती हाताबाहेर “सध्या देशातंर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी कोरोनामुळे आजारी आहेत याची फडणवीसांना माहिती असेल. मोठ्या व्यक्ती महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी झूंज देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आलं पाहिजे. आपल्या कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच तो होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातू काढलं पाहिजे. देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य सर्वांना समजावलं. तसंच लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी संकेत दिले, असंही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPrakash Javadekarप्रकाश जावडेकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस