शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...तर २-३ महिन्यात मंत्रिपद काढून घेतील; मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:09 IST

मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू असं सामंत यांनी म्हटलं. 

नागपूर - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. आम्ही मंत्री असल्याने ज्यांची नाराजी असेल ती दूर करण्याचं काम करू. आम्ही अनेकांशी चर्चा केली आहे. तानाजी सावंत, विजय शिवतारे हे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे बोलून घेतील आणि समजूत काढतील. आमचे इतर आमदारही मंत्रि‍पदासाठी पात्र होते, १२ मंत्री बनवताना नेत्याचाही कस लागतो. मी जर चांगले काम केले नाही तर ज्या नेत्याने आम्हाला मंत्रिपद दिले ते २-३ महिन्यात काढूनही घेऊ शकतात ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळे आम्हालाही शिवसेना आमदार, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन काम करावे लागतील असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्यांवर सामंत यांनी भाष्य केले.

हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंतांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने पहिल्या दिवशी काही नाराज होऊ शकतात. आम्ही सगळे मिळून समजूत काढू. आम्ही १२ मंत्री म्हणजे ६० आमदार मंत्री असल्यासारखेच आहेत. आम्ही कुठेही आमदारांवर अन्याय होऊ देणार नाही. ६० आमदारांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची सेवा करणे ही आमची जबाबदारी आहे. मंत्री कुणाला करायचे की नाही याला बंधने आहेत. ४३ मंत्री आम्हाला करायचे होते. तिन्हीही नेत्यांनी विचार करून मंत्रि‍पद वाटप केले असेल त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. ज्यांना मिळाली नाही तेदेखील तेवढेच सक्षम होते. आमच्या पक्षातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे मिळायला हवी होती. परंतु ४३ पैकी १२ मंत्रिपदे शिवसेनेला मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आमदारांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचा आहे ते आम्ही करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच मलाईदार खाते, समन्वयाचा कुठेही अभाव नाही. तिन्ही नेते साम्यंजस्याने खातेवाटप करतील तुम्हाला अपेक्षित ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही. छगन भुजबळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. मी शिवसेनेत असल्याने त्यांच्यावर मी भाष्य करणे योग्य नाही. त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचं काम अजितदादा करतील. ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व केले आहे त्यांच्यावर मी बोलणे उचित राहणार नाही असं सामंत यांनी म्हटलं. 

दरम्यान, या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास नाही, लक्षवेधी नाही परंतु महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत प्रश्न विरोधकांनी विचारले तर सरकार त्याला उत्तर द्यायला सक्षम आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले नसले तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तर द्यायला सक्षम आहेत. खातेवाटप लवकर होईल. सगळे मंत्री महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळVijay Shivtareविजय शिवतारेTanaji Sawantतानाजी सावंत