shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra | नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

ठळक मुद्देराऊत यांची नारायण राणेंवर गंभीर टीकाराणेंना धड हिंदी बोलता येत नाही की इंग्रजीचा तर पत्ता नाही - राऊतराष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही - राऊत

सिंधुदुर्ग : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (mansukh hiren death case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin vaze) यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याचं राणे यांनी म्हटलं होतं. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टीका करत अमित शाहंनी त्या पत्राला केराची टोपली दाखवली, असा दावा केला आहे. (shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra)

महाराष्ट्रात घडत असलेल्या घडामोडींबाबत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी राज्यात आता राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली होती. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंना धड हिंदी बोलता येत नाही. इंग्रजीचा तर पत्ताच नाही. त्यामुळे दिल्लीत जाऊन करायचे काय, असा बोचरा सवाल राऊत यांनी केला आहे. 

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोकं विनाकारण हस्तक्षेप का करत आहेत? कुमारस्वामींचा थेट सवाल

नारायण राणेंच्या पत्राला केराची टोपली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणेंच्या पत्राची दखल घेतली नाही. राणे यांचे पत्र कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले, असा दावा राऊत यांनी केला. केवळ कुठे तरी बातमी छापून येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी राणेंची ही धडपड आहे, अशी टीका राऊत यांनी केली यावेळी बोलताना केली. 

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती नाही आणि तशी वेळ येणारही नाही, असा विश्वास व्यक्त करत नारायण राणे हे एक अतृप्त राजकारणी आहेत. राणे यांचा डोळा नेहमीच मुख्यमंत्रीपदावर राहिला आहे. त्यांचे हे स्वप्न भविष्यात होणार नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. महाराष्ट्र सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अमित शाह यांना तीन दिवसांपूर्वी पत्र दिल्याचे राणेंनी पत्रकार परिषेदत बोलताना सांगितले होते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.