शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

"जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 07:16 IST

बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली : राऊत

"महाराष्ट्र स्थापनेस ६२ वर्षे झाली तरी ‘मुंबई कुणाची?’ हा प्रश्न कायम चर्चेत असतो. कारण देशाचे हे प्रमुख आर्थिक, औद्योगिक केंद्र महाराष्ट्रापासून वेगळे करावे यासाठी अमराठी धनिकांची अखंड धडपड आजही सुरूच आहे! जे अखंड हिंदुस्थानचे फक्त स्वप्नच दाखवतात तेच लोक महाराष्ट्राचे शत्रू बनले आहे," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

"महाराष्ट्राची वाटचाल नक्की कोणत्या दिशेने चालली आहे? महाराष्ट्र अस्तित्वात येऊन ६२ वर्षे झाली व राज्याच्या निर्मितीचे उत्सव नित्यनेमाने साजरे होत आहेत. पण महाराष्ट्र आज कधी नव्हे इतका अशांत आणि अस्थिर झाला आहे. आदर्शाची हेटाळणी हा सध्याच्या महाराष्ट्रातील एक नवा चाळा होऊ पाहतो आहे. हे आता रोजच घडत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केंद्र सरकार साजरा करीत आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता याचा विसर सध्याच्या केंद्रीय नेतृत्वास पडला आहे," असं म्हणत राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला. त्यांनी आपल्या रोखठोक या सदरातून केंद्रावर हल्लाबोल केला.

काय म्हटलं राऊत यांनी? २४ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान मुंबईत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावच त्या निमंत्रण पत्रिकेवर नाही. हा महाराष्ट्राचाच अपमान. लता मंगेशकर महाराष्ट्राच्या, त्यांना जाऊन चार महिने झाले नाहीत. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावाने पुरस्कार दिला तो मोदींना पंतप्रधान म्हणून. त्यांचेही कर्तव्य होते ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमंत्रितांत नाहीत काय?’’ असे आयोजकांना विचारण्याचे. पण तसे घडले नाही. कारण महाराष्ट्राशिवाय देशाचे राजकारण सुरू झाले आहे आणि मराठी नेते काँग्रेस काळात नव्हते त्यापेक्षा जास्त दिल्लीचे गुलाम झाले आहेत. आजच्या महाराष्ट्र दिनी या स्थितीची खंत कोणाला वाटेल काय?, असा सवाल राऊत यांनी केला.

'बाळासाहेब कधी मुख्यमंत्री झाले नाहीत'"शरद पवार हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय पातळीवरील मोठे नेते. महाराष्ट्र घडविण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र घडविण्याबाबतचे योगदान वेगळय़ा पद्धतीचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते एक व्यंगचित्रकार म्हणून फटकारे मारीत होते. पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कांसाठी ते प्रत्यक्ष रणात उतरले. नंतर त्यांनी केलेली शिवसेनेची स्थापना व त्यातून उभा राहिलेला स्वाभिमानी महाराष्ट्र हे आदर्श कार्य आहे. मुंबईत शिवसेना नसती तर आज ती केंद्रशासित व्हायला वेळ लागला नसता. बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली. शरद पवार हे अनेकदा मुख्यमंत्री व पेंद्रात मंत्री झाले. महाराष्ट्रातल्या औद्योगिक, सामाजिक जडणघडणीत त्यांनी काम केले. यशवंतरावांनी या कार्याची सुरुवात केली. शरद पवारांनी ते शिखरावर नेले," असंही त्यांनी नमूद केलंय.

मुंबई कोणाची?"इतक्या वर्षांनंतरही मुंबई कोणाची, असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे. पण आधी ती महाराष्ट्राची आहे म्हणून हिंदुस्थानची आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची कारस्थाने आजही पूर्णपणे संपलेली नाहीत. आधी मुंबईचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी करायचे व एका बेसावध क्षणी मुंबई केंद्रशासित करायची. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महाराष्ट्रातील भाजपास या सगळ्य़ाची पूर्ण कल्पना आहे. फडणवीस यांनी मुंबईत जे अमराठी पंचक निर्माण केले आहे, त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कशी करता येईल याचे एक ‘प्रेझेंटेशन’ तयार करून गृह मंत्रालयास सादर केले," असा आरोपही यात राऊत यांनी केलाय.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे