Sanjay Raut: मोठी बातमी! विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास, संजय राऊत यांचं सूचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 11:52 IST2022-06-22T11:50:33+5:302022-06-22T11:52:30+5:30

राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut hints towards the dissolution of the Legislative Assembly | Sanjay Raut: मोठी बातमी! विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास, संजय राऊत यांचं सूचक ट्विट

Sanjay Raut: मोठी बातमी! विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने प्रवास, संजय राऊत यांचं सूचक ट्विट

मुंबई-

राज्यातील राजकीय घडामोडींनी आता वेग घेतला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

संजय राऊत यांनी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू असून ते परत येतील असा दावा केला होता. पण आता त्यांनी खळबळजनक ट्विट करुन मोठा ट्विस्ट आणला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. 

जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल
एकनाथ शिंदेंसोबत आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आज सकाळी देखील तासभर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना आणि ते आम्हाला सोडणं शक्य नाही. ते कट्टर शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेतच राहतील आणि संपूर्ण आयुष्य शिवसेनेतच काढतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. 

Read in English

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut hints towards the dissolution of the Legislative Assembly