शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

...पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 5:03 PM

शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला.

मुंबई : सरकार बनविण्याचे सगळे मार्ग खुले आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. लोकांनी महायुतीला मतदान केले होते. असे वक्तव्य त्यांनी का केले, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे सांगत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. तसेच त्यांच्या आजुबाजुचे लोक जे वक्तव्ये करतात त्यामुळे सरकार बनत नाही. असे समजू नका की आम्ही प्रत्यूत्तर देऊ शकत नाही. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही असे करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.  

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी पूजनिय आहेत. भाजपाच्या कोणत्याही नेत्याकडून त्यांचा अपमान होणे शक्य नाही. गेल्या पाच वर्षांत विरोधात लढलो तेव्हाही आमच्या नेत्यांनी टीका केली नाही. अगदी नरेंद्र मोदींनीही नाही. पण गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या 10 दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. दोन्ही ठिकाणी सत्तेत रहायचे आणि टीका करायची आम्हाला कधीही मान्य नाही. मोदीवर अशा प्रकारची काँग्रेसनेही केली नाही. ही टीका आमच्या जिव्हारी लागली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. 

मोदींविरोधात असे शब्द वापरणे सुरूच राहणार असेल तर सरकार कशाला चालवायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांना आमच्याशी चर्चा करण्यास वेळ नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता. अगदी दिवसाला तीन तीन वेळा ते जात होते. काही नेते पैसे देण्याचा आरोप करत आहेत. त्यांनी पुरावा आणून द्यावा, अन्यथा माफी मागावी, असे खुले आव्हान फडणवीस यांनी दिले. 

तसेच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करू शकलो नसल्याचे शल्य सांगतानाच पुढील सरका भाजपाचेच असेल असेही फडणवीस म्हणाले.

अडीज वर्षांचे काही बोलणे नाहीच...अडीज वर्षांचा जो काही विषय आहे. स्पष्ट सांगतो माझ्यासमोर ही चर्चा झालीच नाही. बोलणीवेळीही हा विषय झाला नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या वेळच्या अनौपचारिक चर्चेत तसे बोललो. उद्धव ठाकरे यांती अमित शहा यांच्याशी बोलले असतील तर मला माहिती नाही. शहा, मोदी यांना विचारले असता त्यांनीही या विषयावर बोलणे झाले नसल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी