शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शिवसेनेत एक वर्षही पूर्ण न झालेल्या नेत्याला राज्यसभेचं 'बक्षीस'; ज्येष्ठांना डावललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 13:27 IST

Rajyasabha Election चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते यांना मागे टाकत मिळवली उमेदवारी

ठळक मुद्देज्येष्ठांना मागे टाकत चतुर्वेदींना राज्यसभेचं तिकीटखैरे, गीते, आढळराव पाटील, रावतेंना डावलल्याची चर्चापक्षात येऊन वर्षदेखील न झालेल्या चतुर्वेदींना उमेदवारी

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि दिवाकर रावतेंची नावं चर्चेत होती. मात्र शिवसेना नेतृत्त्वानं चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली. अकरा महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होत्या. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. चतुर्वेदी या पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय मानल्या जातात. शिवसेनेत प्रवेश करताना आदित्य यांनीच  त्यांच्या हाती शिवबंधन बांधलं होतं. आदित्य यांच्या निकटवर्तीय असल्यानं राज्यसभेच्या शर्यतीत चतुर्वेदी यांचं पारडं जड मानलं जात होतं. अखेर पक्षातल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मागे टाकत चतुर्वेदी यांनी उमेदवारी मिळवली. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते हे वरिष्ठ नेते पराभूत झाले. त्यामुळे यापैकी एका नेत्याला राज्यसभेत संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेना-भाजपा सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून काम केलेले दिवाकर रावते यांचं नावदेखील चर्चेत होतं. ज्येष्ठ नेत्याला राज्यसभेत संधी मिळावी असा मोठा मतप्रवाह शिवसेनेत होता.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभाUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी