"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 09:23 IST2025-06-23T09:22:23+5:302025-06-23T09:23:10+5:30
शिंदे गटाचे नेते पुणे अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी शहरात पोस्टर लावून उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याला प्रत्युत्तर दिले.

"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
शिवसेनेच्या ५९वा वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांच्या विरोधकांना आव्हान देण्यासाठी ‘कम ऑन किल मी..’ असा एक डायलॉग म्हटला. यानंतर शिंदे गटाचे नेते पुणे अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी शहरात पोस्टर लावून उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. "ते बोलण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही कामात मग्न आहोत", असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. या पोस्टरमुळे ठाकरे आणि शिंदे गटातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात प्रहार सिनेमाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी.. असेल हिंमत तर या अंगावर… फक्त अंगावर येणार असेल अँबुलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल." त्यानंतर शिंदे गटाकडून पुणे शहरात ते बोलण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही कामात मग्न आहोत, असा मजकुर लिहलेला पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र काढण्यात आले असून त्यांच्या हातात ऑक्सिजन दिसत आहे. तर, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचेही व्यंगचित्र पाहायला मिळत असून त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Posters put up across Pune city, targeting Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray over his reported "Come on, kill me" remark at party's Foundation Day event. The posters have been put up by Shiv Sena’s Pune president, Pramod Bhangire and read, "While they… pic.twitter.com/0uiFuk5S3U
— ANI (@ANI) June 23, 2025
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांदणीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवरक शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मोठ यश मिळाले. परंतु, विधानसभेत त्यांना अपयश आले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राहते की शिंदे गट आपला झेंडा फडकावतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.