Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 08:14 IST2025-06-20T08:14:15+5:302025-06-20T08:14:52+5:30

Eknath Shinde On Uddhav Thackeray: या निवडणुकीतही मतदार तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उपमुख्यमंत्री व शिंदेसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला

Shiv Sena Foundation Day: Eknath Shinde Slams Shiv Sena UBT Uddhav Thackeray | Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची आठवण येते, एरवी हम दो हमारे दो असते. निवडणुकीचे वारे फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व, मराठी माणूस आठवतो आहे. पण मतदार या निवडणुकीतही तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा उपमुख्यमंत्री व शिंदेसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. वरळी येथे आयोजित शिंदेसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिंदेसेनेचे मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते. ऑपरेशन सिंदुरनंतर भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समावेश असलेल्या खा. श्रीकांत शिंदे आणि मुरली देवरा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तर या अनुभवावर आधारित त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही झाला.

उद्धव ठाकरेंचा समाचार घेताना शिंदे पुढे म्हणाले की, हे आता मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला विचारायचे आहे बाळासाहेबांनंतर मराठी माणसासाठी यांनी काय केले त्याचा हिशोब द्या. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतील मराठी माणूस बाहेर गेला, हे पाप तुमचे आहे, गेली २० वर्ष मुंबईत कुणी सत्ता गाजवली हे सर्वश्रुत आहे.

नवे अभियान
सासरच्या छळाला कंटाळून एका लेकीने आपले आयुष्य संपवले. ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे, त्यासाठी आज आपण ‘लाडक्या लेकीचे रक्षण, हेच शिवसेनेचे वचन’ अभियान सुरू केले आहे. प्रत्येक घरातील सून ही एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे हे सांगून ठेवतो, अशा इशारा शिंदेंनी दिला आहे.

हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा 
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले कम ऑन किल मी, ते इंग्लीश पिक्चर बघून आले असतील, पण मरे हुए को क्या मारना, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला. नुसता करून शोर मनगटात येत नाही जोर, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो, अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंच्या भाषणाचा समाचार घेतला. ऑपरेशन सिंदुरवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींचाही शिंदे यांनी यावेळी समाचार घेतला. गांधींचा आपल्या लष्करावर, पंतप्रधानांवर विश्वास नाही, त्यांना पाकिस्तानवर विश्वास आहे. गांधी आणि उबाठाच्या चमच्यांना प्रश्न पडलाय किती विमाने पडली, किती ड्रोनचे नुकसान झाले. भारतीय लष्कराच्या पराक्रमावर प्रश्न विचारताय, हा देशद्रोहापेक्षा मोठा गुन्हा आहे. तुम्ही भारतीय आहात की पाकचे एजंट आहात, असा सवाल शिंदेंनी केला. 

Web Title: Shiv Sena Foundation Day: Eknath Shinde Slams Shiv Sena UBT Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.