शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसंग्राम संघटनेचा करणार राजकीय पक्ष

By admin | Updated: May 27, 2014 05:42 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा आरक्षणावरून समाजाच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला

 पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा आरक्षणावरून समाजाच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित शिवसंग्राम संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रूपांतर करणार आहे. येत्या विधानसभा निवडणुका महायुतीबरोबर लढविणार असून, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही मराठा आरक्षण जाहीर करण्यास काँग्रेस आघाडीने टाळाटाळ केली. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आमदार मेटे यांनी महायुतीशी घरोबा केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीला पाठिंबा दिला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची भूमिका जाहीर करण्यासाठी पुण्यात सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई डबेवाले संघटनेचे गंगाराम तळेगावकर, संदीप तेलगावकर, डॉ. भारती लवेकर, उदय आहेर, अ‍ॅड. विजय कातोरे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर करण्याच्या ठरावाला एकमताने मान्यता देण्यात आली. येत्या दोन आठवड्यात नव्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणे व जाहीरनामा ठरविण्यात येणार असून, २० जूनला मुंबई येथे मेळावा घेऊन पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस आघाडीच्या आमदारांना निवडून येण्यासाठी आणि सत्तेसाठी मराठा समाज बरोबर पाहिजे. परंतु, समाजाच्या अडचणी व समस्या सोडविण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी स्मारकांची केवळ घोषणाच होते. काँग्रेस आघाडीने मतासाठी शिवाजी, शाहू, फुले व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला जातो. राज्यघटनेतील नियमानुसार आरक्षण देता येत असूनही काँग्रेस आघाडी सरकार स्वार्थी राजकारण करीत दुर्लक्ष करते. त्यामुळे शिवसंग्राम संघटना राजकारणात येऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)