उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'पार्थ'वरील पुण्यातील जमिन घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच, आता काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहेत. सनाईक यांनी मिराभाईंदरमध्ये २०० कोटिंची जागा, ३ कोटिंमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते चंद्रपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते."...तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो, लुटा...!"-माझ्याकडे एक प्रकरण आले आहे. यासंदर्भात मी उद्या सविस्तर माहिती देणार आहे. सर्व्हेनंबरसह माहिती देतो. आपण यातही लक्ष घालावे. या राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे. मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षनिक संस्थेला मिराभाईंदरमधील ४ एकर प्राइम लँड, जिची किंमत बाजारमूल्याप्रमाणे २०० कोटी रुपये आहे, ती ३ कोटी रुपयांमध्ये घेतली आहे. मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का? आणि जर हे होऊ शकते, तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा...! असे म्हणायची वेळ आता आली आहे.
"तक्रार दिली, तर...!" -दरम्यान भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी, विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर भाष्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, "वडेट्टिवार कोणत्या प्रकरणासंदर्भात बोलत आहेत, जर त्यांनी मला काही तक्रार दिली, तर..., हे लोक केवळ माध्यमांमध्ये बोलतात. प्रश्न असा आहे की, तक्रार द्यायला हवी ना. तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तसेही, परवाच्या घटनेवर (पार्थ पवार) कुणाची तक्रार नाहीये. पण आम्हाला ते प्रकरण समजल्यावर आम्ही कारवाई केली. त्यावर आम्ही चौकशी नेमली. आम्हाला ते आढळलं. आम्ही कारवाई केली."
Web Summary : Congress MLA Vijay Wadettiwar accuses Minister Pratap Saranaik of acquiring prime land worth crores for a pittance. Wadettiwar challenges authorities to investigate the alleged scam, questioning governmental oversight. BJP's Bawankule urges formal complaint.
Web Summary : कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने मंत्री प्रताप सरनाईक पर करोड़ों की प्राइम लैंड कौड़ियों के मोल हासिल करने का आरोप लगाया। वडेट्टीवार ने अधिकारियों से कथित घोटाले की जांच करने की चुनौती दी और सरकारी निगरानी पर सवाल उठाया। बीजेपी के बावनकुले ने औपचारिक शिकायत का आग्रह किया।