Maharashtra Politics: “डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:43 IST2023-02-07T16:42:39+5:302023-02-07T16:43:26+5:30
Maharashtra Politics: जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरुन शिंदे गटातील नेत्याने टीका केली.

Maharashtra Politics: “डोकं आऊट झालंय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाचा जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांवरून भाजपसह शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विधानांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. शिंदे गटातील नेत्याने जितेंद्र आव्हाड यांना खोचक टोला लगावत, ज्यांचे डोके आऊट झाले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार, असा सवाल केला आहे.
मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. यानंतर शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
डोके आऊट झाले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार
शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे डोके आऊट झाल्याचे सांगत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे म्हटले होते.
दरम्यान, जी लोक आपल्या वक्तव्यावर आक्षेप घेतात त्यांनी अंदमानाचा इतिहास बाजूल काढून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समजून सांगावा, असा आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले. जितेंद्र आव्हाड सरळ आणि थेट बोलतो. मी माझ्या मतावर ठाम असतो. माझे वक्तव्य २ हजार टक्के वादग्रस्त नाही, असेही आव्हाड म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"