शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक

By admin | Updated: October 12, 2016 15:52 IST

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 12 - पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याच्या प्रकार केला. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले.उमेश कोकरे, विजय भोसले आणि नितीन काळे अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बारामती होस्टेलचे सुपरिटेंड शिवाजी काळे यांनी फिर्याद दिली आहे. भगवानगड येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयाची मोडतोड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती.याप्रकारानंतर बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय समाज पक्षाचे ६ ते ७ कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमध्ये शिरु लागले, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ त्यांना न जुमानता ते आत शिरले. आतल्या बाजूला असलेल्या शरद पवार यांच्या फोटोवर त्यांनी शाई फेकली व ते पळून जाऊ लागले. तेव्हा तेथील तरुणाने उमेश कोकरे याला पकडले. ही घटना समजताच जनवाडी पोलीस चौकीतील पोलिसांनी तेथे येऊन काकरे याला ताब्यात घेतले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही घटना समजताच आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक निलेश निकम, युसुफखान, उदय महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस चौकीसमोर गर्दी केली़ तेव्हा रासपचे कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोनाफोनी करीत होते़ त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्यात वादावादी झाली़ काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले. जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड करताना रासपचे राज्य सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या आई, पत्नी व मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही़ त्याच्यानिषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचे उमेश कोकरे याचे म्हणणे आहे.