शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 14:05 IST

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा दंगल गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

ठळक मुद्देआयोगाची ४ एप्रिल रोजी हजर राहण्यासंदर्भात नोटीस  पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या अनेकांना पोलिसांनी केली अटक

पुणे :   कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपासाबाबत नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ४ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचा आदेश या नोटीसव्दारे आयोगाने दिला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल झाली होती.  याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या  अनेकांना अटक केली आहे. यातील 9 जण सध्या अटकेत आहेत. दरम्यान  शरद पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेत हा गुन्हा एनआयएकडे सोपवला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवार यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पवार चौकशी आयोगासमोर हजर राहणार का? आणि हजर राहिले तर काय साक्ष देणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

* कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर पवार यांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी कुणाला जबाबदार धरले नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पवार यांंनी काही  विधाने केली आहेत. या विधानातून त्यांनी काही आरोप केले आहेत. यामुळे कोरेगाव भीमाच्या दंगलीबाबत पवारांकडे सांगण्यासारखी माहिती असेल, किंवा पुरावे असतील हे त्यांनी सांगितल्यास रेकॉर्डवर येण्यास मदत होईल. म्हणून आयोगाकडे पवार यांनी आयोगापुढे हजर राहावे असे निवेदन दिले होते. आता पवारांकडे जी माहिती असेल ते रेकॉर्डवर येईल.यानिमित्ताने संबंधित प्रकरणातील सत्यता समोर येईल.  यासाठी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. -अ?ॅड. प्रदीप गावडे (याचिकाकर्ते)  

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPoliceपोलिसSharad Pawarशरद पवारArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाState Governmentराज्य सरकार