देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे यांचं लग्न ठरलं असून, रेवती सुळे ह्या लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचं सारंग अरुण लखानी यांच्यासोबत लग्न ठरलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुळे आणि लखानी कुटुंबीयांमधील ही सोयरिक जुळल्याचे सांगण्यात येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या संदर्भातील माहिती दिली आहे. मात्र या दोघांचाही विवाह सोहळा कधी होणार याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.
Web Summary : Sharad Pawar's granddaughter, Revati Sule, is set to marry Sarang Lakhani. The families connected through Devendra Fadnavis and Nitin Gadkari. Sarang Lakhani is the son of Arun Lakhani, Chairman of Vishwaraj Group and a badminton player. The wedding date is yet to be announced.
Web Summary : शरद पवार की पोती, रेवती सुले, सारंग लखानी से शादी करने वाली हैं। देवेंद्र फडणवीस और नितिन गडकरी के माध्यम से परिवारों का संबंध हुआ। सारंग लखानी विश्वराज ग्रुप के अध्यक्ष अरुण लखानी के बेटे और बैडमिंटन खिलाड़ी हैं। शादी की तारीख अभी घोषित नहीं की गई है।