शरद पवारांना ‘डिस्चार्ज’

By Admin | Updated: December 19, 2014 05:10 IST2014-12-19T05:10:33+5:302014-12-19T05:10:33+5:30

पायाच्या दुखापतीमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले.

Sharad Pawar's 'discharge' | शरद पवारांना ‘डिस्चार्ज’

शरद पवारांना ‘डिस्चार्ज’

मुंबई : पायाच्या दुखापतीमुळे ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील निवासस्थानी घसरून पडल्याने पवारांच्या पायाला दुखापत झाली होती. त्या वेळी त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने मुंबईत आणण्यात आले होते.
पवारांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान येथील डॉक्टरांनी केले. त्यानुसार मागील शुक्रवारी त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यानंतर पवारांना विश्रांती घेण्यासाठी आठवडाभर रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Sharad Pawar's 'discharge'