शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसारखी यवतमाळमध्ये दारुबंदीची शरद पवार यांची मागणी

By admin | Updated: September 27, 2015 05:38 IST

वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

मुंबई : वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याच्या धर्तीवर आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. पवार यांनी अलिकडेच विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागाच्या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पवार यांनी म्हटले आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि शेतमालास योग्य बाजारभावाचा अभाव यांच्या दुष्टचक्रातून सुटका न होणे ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. वैफल्यग्रस्त शेतकरी व्यसनाधीनतेकडे झुकून मृत्यूला कवटाळण्याचे प्रकार होत असल्याचे आत्महत्याग्रस्त गावांतील महिलांनी आपल्याला सांगितले. गावातून दारू हद्दपार करण्यासाठी त्या गावातील ५० टक्के महिला मतदारांनी दारुबंदीसाठी मतदान करणे अनिवार्य असते. मतांची ही टक्केवारीची अट नापिकी आणि आत्महत्याग्रस्त भागात सरकारने कमी करावी. तसेच, यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीचा विचार करावा. नापिकी आहे आणि शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे त्या भागात सरकारने कर्जमाफी करावी. संपुआ सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी कापसाला प्रतिक्विंटल ६५०० रुपये आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी केली,असे पवार यांनी या पत्रात म्हटले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत शेतजमीन कर्त्याच्या नावावर असल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नसते. या शिवाय, वर्षानुवर्षे जमीन कसत असणारे कूळ, सरकारी जमिनींवरील जुन्या अतिक्रमणदार शेतकऱ्यांची, देवस्थान जमिनींवरील जुन्या वहिवाटदारांची नावे हक्क-अभिलेखी मालकी हक्कात नमूद नसतात. म्हणून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याच्या सरकारी निकषांत बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.