शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अर्ध्या तासासाठी ३५ हजार कोटी देणे अयोग्य, शरद पवार यांचे बुलेट ट्रेनवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 05:16 IST

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून फक्त ३५ मिनिटे प्रवास करेल आणि गुजरातमध्ये ती अडीच तास चालेल. आपल्याकडे त्याची फक्त दोन तीन स्टेशन आहेत.

मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन महाराष्ट्रातून फक्त ३५ मिनिटे प्रवास करेल आणि गुजरातमध्ये ती अडीच तास चालेल. आपल्याकडे त्याची फक्त दोन तीन स्टेशन आहेत. त्यासाठी ३५ हजार कोटींचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करणे अव्यवहार्य असल्याचे सांगून राज्याला बुलेट ट्रेन लाभदायक नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यापेक्षा मुंबईतील लोकल प्रवास सुखकर होण्यासाठी सरकारने खर्च केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.बुलेट ट्रेन प्रकरणी प्रशासन किती बेफिकीरीने वागत आहे. हे लक्षात येते, असा टोलाही पवारांनी मारला. ठाण्यातील इक्बाल कासकर प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संशयाची सूई असल्याचे विचारले असता पवार म्हणाले, जो पोलीस अधिकारी तुरुंगाची हवा खाऊन येतो. ज्यावर खंडणी, एनकाऊंन्टरचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कृती विषयी काय बोलावे, स्वत:ची प्रतिमा पुसून काढण्यासाठी कोणी जर आमच्या नेत्यांवर आरोप करत असेल तर हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांपुढे नेला जाईल, असे ते म्हणाले.राज्य सरकारने दिवाळीपर्यंत कर्जमाफी देऊ, असा शब्द दिला होता. तसे न झाल्यास ५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे शेती क्षेत्रात काम करणाºया कार्यकर्त्यांना सोबत घेऊन असहकार आंदोलन पुकारू, असा इशाराही पवार यांनी दिला. ‘सरसकट’ कर्जमाफीशी तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पवार म्हणाले, राष्ट्रवादी किसान मंचचे राज्यप्रमुख शंकरअण्णा धोंडगे यांनी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानातंर्गत राज्यभर दौरे केले आहेत. आॅनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती केल्यामुळे शेतकºयांना २०० ते ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. कर्जमाफीचा पत्ता नाही पण फॉर्म भरण्यातच शेतकरी मेटाकुटीला आला आहे.दीड लाखांवर कर्ज असलेल्यांना दिलेला वन टाईम सेटलमेंटचा पर्याय योग्य नाही. साडेचार लाखाचे कर्ज शेतकरी फेडू शकला तर तो थकबाकीदार झाला असता का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.‘त्या’ पक्षाविषयी काय बोलावे?नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढला आहे, त्याबद्दल आपले मत काय, असे विचारल्यावर पवार म्हणाले, ज्यांचे चिरंजीव आणि समर्थक आमदार त्यांच्या नवीन पक्षात जायला तयार नाहीत त्या पक्षाविषयी मी काय बोलावे?

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBullet Trainबुलेट ट्रेनNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी