उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:59 PM2024-01-09T13:59:07+5:302024-01-09T14:00:22+5:30

हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती असं शरद पवारांनी म्हटलं. 

Sharad Pawar Uddhav Thackeray angry over Rahul Narvekar-Eknath Shinde meeting | उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले

उद्या लोकशाहीचा खून करणार?; नार्वेकर-शिंदे भेटीनं वादळ उठलं, पवार-ठाकरे कडाडले

मुंबई - आमदार अपात्रतेबाबत १० जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय सुनावण्याची मुदत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांकडे पूर्ण झाली असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. त्यातच अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी यावर आक्षेप घेत ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे. 

शरद पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत म्हटलं की, ज्यांच्यापुढे प्रकरण आहे आणि ज्यांची केस आहे. ती केस मांडणे चुकीचे नाही. परंतु ज्यांच्यासमोर केस मांडली आहे आणि ज्यांच्याकडून निकाल अपेक्षित आहे. त्यांनी ज्यांची केस आहे  त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते. हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती असं त्यांनी म्हटलं. 

तर हा खटला वैयक्तिक नसून देशात पुढे लोकशाही राहणार आहे की नाही. हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत हे उद्याच्या निर्णयावरून कळेल. मी मुख्यमंत्री होतो. कधीही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाही तर अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना बोलावून घेऊ शकतात. परंतु हे दोघे फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष नाहीत. एक न्यायाधीश आहे तर दुसरे आरोपी आहेत. मग न्यायाधीश ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना भेटू शकतात का? यातून संशय येतो की या दोघांची मिलीभगत तर नाही ना..असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. 

दरम्यान, आम्ही सुप्रीम कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यात एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट झाली हे सांगितलं आहे. जनतेच्या कोर्टात आम्ही जातोय. जनतेचा अधिकार कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. मागील २ वर्षापासून हा खटला चालतोय. काहीही आवश्यकता नव्हती. सरळ सरळ यात सर्वकाही स्पष्ट आहे. घटनातज्ज्ञांची प्रतिक्रिया जनतेने पाहावी. इतका वेळ यात बर्बाद झाला. बेकायदेशीर सरकारच्या हातात राज्याचे भवितव्य आहेत हे धोक्याचे आहे. उद्या काय होणार याबाबत निकालातून दिसेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

Web Title: Sharad Pawar Uddhav Thackeray angry over Rahul Narvekar-Eknath Shinde meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.