Sharad Pawar vs Pm Modi: "शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली"; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 04:06 PM2022-08-10T16:06:22+5:302022-08-10T16:07:11+5:30

शरद पवार यांचा १७ ट्वीट्स करत भाजपाला इशारा, शिंदे गटालाही सुनावलं...

Sharad Pawar slams Pm Narendra Modi led BJP with 17 tweets thread also speaks about Shiv Sena Eknath Shinde | Sharad Pawar vs Pm Modi: "शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली"; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Sharad Pawar vs Pm Modi: "शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली"; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

Sharad Pawar vs Pm Narendra Modi: भारतात सध्या भाजपा विरूद्ध इतर लहान-मोठे पक्ष असा सामना रंगल्याचे चित्र आहे. एकीकडे महाराष्ट्रात भाजपाने महाविकास आघाडी फोडून सत्तास्थापना करण्यात यश मिळवले. तर दुसरीकडे बिहारमध्ये जेडीयुच्या नितीश कुमारांनी भाजपाची साथ सोडून प्रादेशिक पक्ष असलेल्या राजदच्या साथीने सरकार स्थापित केले. भाजपा प्रादेशिक पक्षांची ताकद कमी करत असल्याची आणि सत्तेचे केंद्रीकरण करत असल्याची सातत्याने टीका केली जाते. याच मुद्द्यावरून आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि मोदी सरकारला तब्बल १७ ट्वीट्स करत इशारा दिला.

नेतृत्व मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत घडलं तसं घडतं!

"आज देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या विविध घडामोडींबाबत माध्यमांसमोर भूमिका मांडली. श्रीलंकेत एकाच कुटुंबाची अनेक वर्षे सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री या सगळ्या सत्तेचे केंद्रीकरण त्याठिकाणी झाले. ते होत असताना लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची जी नेतृत्वाची जबाबदारी होती ती हवी त्या प्रमाणात पाळली गेली नाही. त्यामुळे श्रीलंकेत असंतोष वाढायला लागला. हा असंतोष एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा नाही तर गेले काही महिने सतत असंतोष वाढत होता. परिणामी अखेर उद्रेक झाला आणि तिथे राज्यकर्त्यांना सत्ता सोडावी लागली. आज भारताच्या दृष्टीने आजूबाजूच्या देशांमध्ये अंतर्गत परिस्थिती नीट राहणे गरजेचे आहे. ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते. तेच आज आपल्याला बांग्लादेशमध्ये दिसायला लागलेय. कदाचित पाकिस्तानमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे", असा इशारा शरद पवार यांनी दिला.

भाजपा प्रादेशिक पक्षांना संपवत आहे!

"जिथे सत्ता केंद्रीत झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतामध्ये सत्ता राष्ट्रीय पातळीवर केंद्रीत होईल का अशी शंका लोकांच्या मनात येत आहे. आज तसे चित्र दिसत नाही, परंतु आपण सावध राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे, असं सूचक विधान पवार यांनी केले.

शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली!

"महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एक प्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले.

नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे!

असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला.

शिंदे गटाचे कान टोचले...

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात. ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत.

Web Title: Sharad Pawar slams Pm Narendra Modi led BJP with 17 tweets thread also speaks about Shiv Sena Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.