आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; अजित पवार, पक्षफोडीवर शरद पवारांचे महत्वाचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 20:06 IST2023-04-23T20:02:45+5:302023-04-23T20:06:21+5:30
राज्यात सध्या फोडाफडीचे राजकारण सुरू आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं परखड मत व्यक्त केले आहे.

आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; अजित पवार, पक्षफोडीवर शरद पवारांचे महत्वाचे विधान
वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. आंबेडकर मविआमध्ये येणार का, यावर उत्तर देताना पवार यांनी त्यांच्याशी भेट ही कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने झाल्याचे सांगितले. याचबरोबर अजित पवार आणि पक्ष फोडाफोडीवरही पवारांनी सूचक वक्तव्य केले आहे.
राज्यात सध्या फोडाफडीचे राजकारण सुरू आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं परखड मत व्यक्त केले आहे. अजित पवार यांना फोडण्याचे प्रयत्न सुरु असल्यावर विचारताच पवार यांनी याला नकार दिला नाही. परंतू जे वक्तव्य केले आहे, यावरून राजकीय अर्थ काढले जात आहेत.
कोणी राष्ट्रवादी पक्ष फोडायचे काम करत असेल तर ती त्यांची रणनीती असेल, त्यांची भूमिका असेल. आम्हाला काय भूमिका घ्यायची ते आम्ही तेव्हा घेऊ, असे वक्तव्य शरद पवार यांनी करत तसे प्रयत्न करणाऱ्यांना एकप्रकारे तंबीच दिली आहे.
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाली असल्याचे सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. या जागांच्या अनुषंगाने आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाली असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातही वंचित राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"