शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रोहित पवार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक; प्रोफाईल फोटोवर झळकला 'सिया राजपूत'चा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 21:22 IST

रोहित पवार यांनी ट्विटरवरून अकाऊंट हॅक झाल्याची दिली माहिती

Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे फेसबूक अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईलवर सिया राजपूत हे नाव दाखवले जात आहे. तसेच, फेसबुक कव्हर फोटोवरही सिया राजपूत असंच नाव दिसत आहे. "गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत  फेसबुक पेज हॅक झालं… या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत," असे ट्विट रोहित पवार यांनी केलेले आहे.

रोहित पवार सामाजिक व राजकीय जीवनातील बहुतांश गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत व चाहत्या वर्गापर्यंत पोहोचवत असतात. ते सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून, गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडिया खाती हॅक होत असल्याचे प्रकार समोर आले आल्याचे ते म्हणत आहेत. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्याशिवाय या हॅक केलेल्या अकाऊंटच्या रिकव्हरीसाठीही प्रयत्न सुरु असल्याचे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

रोहित पवार यांचे फेसबुकवर 537k फॉलोअर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटचा प्रोफाइल फोटो आणि कव्हर फोटो वगळता, एक मेसेजही पोस्ट करण्यात आला आहे. रोहित पवार यांनीच या पेजचे नाव रि-ब्रँडिंगच्या हेतुने बदलले असल्याचाही एक मेसेज पोस्ट करण्यात आला आहे. परंतु. रोहित पवारांनी ट्विटरवर हे हॅकरचे काम असल्याचे म्हटले आहे.

--

महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचे युरआरएलही बदलण्यात आले असून ते, /SiyaRajput.Real असे दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसतेय. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट केल्याचे दिसतेय. पण पेज नेमके कुठून आणि कुणी हॅक केले आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारFacebookफेसबुकNCPराष्ट्रवादी काँग्रेसTwitterट्विटर