शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह; बदमाश आणि ###खोर"; संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान, नव्या वादा फुटले तोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 20:13 IST

Sambhaji Bhide Statement on Sharad Pawar: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शरद पवार यांना देशद्रोही म्हणत वादग्रस्त विधान केले आहे.

Sambhaji Bhide Controversial Statement: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे वादात सापडले आहे. संभाजी भिडे यांनी आता शरद पवार यांच्यावर टीका करताना ते देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शरद पवार हे बदमाश आहेत, असे विधानही त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संभाजी भिडे हे सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. त्यांची धारातीर्थी यात्रा ही रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील लोहगड, भीमगड अशा गडकिल्ल्यांसाठी सुरू आहे. 

संभाजी भिडे शरद पवारांबद्दल काय बोलले?

या यात्रेदरम्यानच माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. "शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि ###खोर आहेत. राज्यातील लवासाची कीड काढून टाकली पाहिजे", असे विधान भिंडेंनी शरद पवारांबद्दल बोलताना केले. 

संभाजी भिडे यांच्या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. उद्धवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजी भिडे यांनी केले विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

भिंडेंच्या विधानावर अंबादास दानवेंची टीका

"टीका टिप्पणी करणे अयोग्य आहे की योग्य, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवारांना राष्ट्रद्रोही म्हणणे अतिशय चुकीचे आहे. शरद पवार हे या देशासाठी, महाराष्ट्रासाठी झिजणारे नेतृत्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप लावणे एकदम चुकीचे आहे", अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी संभाजी भिडे यांच्या विधानावर टीका केली आहे. 

शरद पवारांबद्दल असेल, तर संदर्भ समजून घेणे आवश्यक -शंभूराज देसाई

संभाजी भिडे यांच्या या विधानाबद्दल जेव्हा कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, "संभाजी भिडे गुरूजी यांनी नेमके काय वक्तव्य केले आणि कोणत्या संदर्भात केले, हे ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य असेल, तर त्याचा संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे", असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

भिडे गुरुजी खरं बोलले आहेत -गुणरत्न सदावर्ते

संभाजी भिडे यांच्या विधानाचे गुणरत्न सदावर्ते यांनी समर्थन केले आहे. सदावर्ते म्हणाले, "शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, अत्यंत, शंभर टक्के सत्य बोलले आहेत भिडे गुरूजी. कारण लक्षात ठेवा हेच ते शरद पवार आहेत, एका बाजूला जवळच्यांना साखर कारखाने उभे करून देत होते. सहकार उभा करून देत होते आणि दुसरीकडे जे आदिवासी, अनुसूचित जाती, जमातीतील बंधू विद्यापीठाचे नामांतर मागत होते. एकीकडे माया देत होते, तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते. त्यामुळे भिडे गुरूजी शंभर टक्के सत्य बोलले आहेत."

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhaji Bhide calls Sharad Pawar a traitor, sparking controversy.

Web Summary : Sambhaji Bhide's controversial statement labels Sharad Pawar a traitor and corrupt. This ignited political backlash, with Ambadas Danve criticizing Bhide's remarks. Gunratna Sadavarte supported Bhide.
टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण