'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:53 IST2025-09-27T10:52:48+5:302025-09-27T10:53:21+5:30
Devendra Fadnavis on Thackeray Pawar: एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'रॅपिड फायर'मध्ये काही नेत्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
Devendra Fadnavis Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे, डोनाल्ड ट्रम्प, अजित पवार, अमित शाह, एकनाथ शिंदे, मनोज जरांगे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'रॅपिड फायर'मध्ये विचारण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांच राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांबद्दल दिलखुलासपणे उत्तरे दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले. वेगवेगळ्या नेत्यांबद्दल काय वाटते, याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांनाही मनमोकळेपणाने उत्तर दिले. एकनाथ शिंदे हे भावनिक मित्र आहेत, तर अजित पवार हे प्रॅक्टिकल मित्र आहेत, असे ते म्हणाले. शरद पवार उकल झालेलं, न उमजलेलं कोडं आहे, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी ते जरांगे, फडणवीसांनी काय दिली उत्तरे?
उद्धव ठाकरे - कभी हा, कभी ना
एकनाथ शिंदे - इमोशनल मित्र
अजित पवार - प्रॅक्टिकल मित्र
शरद पवार - उलगडलेलं, पण न समजलेलं कोडं
मनोज जरांगे पाटील - मला असं वाटतं की, त्यांनी इतकी उपोषणं केली आहेत की, त्यांना आता उपोषण वीर म्हणू शकतो.
नरेंद्र मोदी - नव्या भारताचे निर्माते
अमित शाह - सरसेनापती
नितीश कुमार - कॉमन मॅन (सामान्य माणूस)
डोनाल्ड ट्रम्प - गोंधळलेला माणूस
सॅम पित्रोदा - जसा शिष्य तसा गुरू, जसा गुरू तसाच शिष्य
अरविंद केजरीवाल - ते कुठे आहेत?
कुणाल कामरा - कोण आहे हा?