“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:38 IST2022-07-27T12:36:38+5:302022-07-27T12:38:37+5:30
वाचा काय म्हणाले आव्हाड?

“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत
“आज दिवसभर समाज माध्यमांवर एक बातमी पसरते आहे की, जितेंद्र आव्हाडांनाशरद पवारांनी एकटे का पाडले. आज जे मी कधीच कोणाला बोललो नाही. सांगितले नाही ते मी इथे लिहीत आहे.” असे म्हणत माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. आव्हाड यांनी या पोस्टच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आजपर्यंतच्या माझ्या राजकीय लढाईत मी गेले ३५ वर्षे त्यांच्याबरोबर आहे. अनअनेकांनी माझ्या विरोधात कुरघोड्या गेल्या, माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचली, अनेक कटकारस्थाने रचली गेली. ते सगळे एकाच कारणाने यशस्वी होऊ शकले नाही. ते एकमेव कारण होते शरद पवार. तरी उगाच गैरसमज पसरविण्याच्या बातम्या लावू नका. आदरणीय शरद पवार साहेबांनी कधी मला एकटे पाडले नाही त्यामुळेच मी इथं पर्यंत पोहचू शकलो. हे सगळं माझ्या निष्ठेचे फळ आहे,” असे आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाहा काय आहे त्यांची फेसबुक पोस्ट?