Maharashtra Karnataka Border Dispute: “बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन येईन”: शहाजीबापू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 18:04 IST2022-12-03T18:02:59+5:302022-12-03T18:04:32+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमाप्रश्नावर राजकीय वातावरण तापलेले असताना शहाजीबापू पाटील यांनी मोठा निर्धार व्यक्त केला आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: “बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन येईन”: शहाजीबापू पाटील
Maharashtra Karnataka Border Dispute: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकावर निशाणा साधताना दिसत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी एक निर्धार व्यक्त केला आहे. बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन येईन, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, पक्षाने आदेश दिला तर मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून येईन. कुणाला कळणारही नाही. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायला हवा, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील मराठी भाषिक गावांत संवेदनशील वातावरण
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न उफाळून आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे. तर महाराष्ट्रातील अनेक गावांनीही कर्नाटकात जाण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. तसेच कर्नाटकातील मराठी भाषिक गावांतही संवेदनशील वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवले आहे. सीमाभागातील गावांमध्ये तणावाचे वातावरण असल्याने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा सूचना बोम्मई यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी नवस का केला जात नाही? महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. परंतु, याबद्दल मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"