शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

सात महिलांनी केले पतीला किडनीदान!

By admin | Updated: March 15, 2015 02:18 IST

अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़

अवयवदानाचे महत्त्व पटले : सातही दाम्पत्ये जगताहेत निरोगी आयुष्यनासीर कबीर - करमाळा (जि. सोलापूर)अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़ किडनीसारखा महत्त्वाचा अवयव देताना रक्ताचे नातेही पुढे येत नाही़, तेथे या महिलांनी पतीला आपली किडनी दान करून वस्तुपाठ घालून दिला आहे़ करमाळा शहरातील अशोकलाल बोरा, संजयकुमार देवी, अशोक क्षीरसागर, दशरथ कणसे, अनिल कणसे, अजित मसलेकर व किरण सूर्यपुजारी या सात जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीचा आजार जडला होता. मानवी शरीराची प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी प्रत्येक अवयव तसा महत्त्वाचाच असतो़ त्यातही किडनी तर मुख्य अवयव़ त्यालाच विकार जडला तर माणसाचा जीवच धोक्यात येतो़ पण तन आणि मनाने एकरूप झालेल्या जिवाला अर्ध्यावर कसे सोडणार, या विवंचनेतूनच या महिलांनी पतीला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला व तो प्रत्यक्षात आणला़ पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये या सातही जणांवर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली़ सातही दाम्पत्ये आज उत्तम व निरोगी आयुष्य जगत आहेत.आधुनिक सावित्री... संगीता अशोकलाल बोरा, सीमा संजयकुमार देवी, कमल दशरथ कणसे, सविता अनिल कणसे, स्वाती अजित मसलेकर, प्रतीक्षा किरण सूर्यपुजारी, प्रतीक्षा अशोक क्षीरसागऱस्त्रीच्या हृदयात माया, प्रेम, वात्सल्य व त्याग भरलेला आहे. जगाच्या पाठीवर आई, पत्नी, बहीण, मुलगी या नात्याची व्याख्या शब्दातीत आहे़ मला जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो़- अजित मसलेकर, रुग्णपती हाच परमेश्वर अशी धारणा मनात ठेवून किडनी दान केली़ यामुळे त्यांचे आयुष्य वाढले. मी स्वत:ला भाग्यवान व पुण्यवान समजते़- सविता कणसे