शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

By admin | Updated: June 30, 2017 02:07 IST

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी,

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी, एक एनजीओ सदस्य या समितीत असणार आहे. तसेच गुरुवारी कारागृह प्रशासनाकडून राज्य महिला आयोगाला चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात मंजुळाच्या गुप्तांगात जखम नसल्याचा दावा त्यांनी प्राथमिक अहवालावरून केला आहे. मात्र कारागृह प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.वॉर्डन मंजुळाला झालेल्या अमानुष मारहाणीत २३ जून रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कारागृहातील महिला कैद्यांचा उद्रेक झाला. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी जेल अधिकारी मनीषा पोखरकरसह सहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र आठवडा उलटत आला तरी आरोपींवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी पोलीस महानिरीक्षक (कारागृहे) स्वाती साठे यांनी हा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर केला. यामध्ये घटनेचा उल्लेख करत मंजुळाच्या गुप्तांगाला जखम नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तिच्या अंगावर अनेक जखमा असल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात केला आहे. याचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे. त्यांच्या चौकशी अहवालामुळे कारागृह प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. हा विषय संवेदनशील असल्याने राज्यातील महिला कैद्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध कारागृहांतील महिलांची काय परिस्थिती आहे; तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाय योजना केल्या, याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये माजी न्यायमूर्ती, माजी पोलीस आयपीएस अधिकारी, एक एनजीओ सदस्य असतील. येत्या दोन दिवसांत एसआयटी समितीतील सदस्यांची नावे घोषित करणार असल्याची माहिती महिला आयोग अध्यक्ष विजया रहाटकरयांनी दिली. मंजुळा प्रकरणाचा शवविच्छेदन अंतिम अहवाल लवकरात लवकर मिळावा, अशी मागणीदेखील या वेळी त्यांनी केली. गुरुवारी सायंकाळी त्यांनी कारागृहाला भेट दिली. इंद्राणीलाही मारहाणमंजुळाप्रमाणे आपल्यालाही मारहाण झाल्याचा दावा करत इंद्राणीने सीबीआय कोर्टात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार बुधवारी सीबीआय कोर्टाच्या आदेशाने नागपाडा पोलिसांनी इंद्राणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. बुधवारी तिची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिला मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती जे.जे. रुग्णालयाकडून गुरुवारी समोर आली आहे. त्यानुसार नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.