शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम

By admin | Updated: June 3, 2015 02:13 IST

ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा,

संदीप प्रधान, मुंबईग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रालगतच्या समुद्राच्या पातळीत २०५० पर्यंत २ सेमी तर २१०० पर्यंत ४ सेमी इतकी वाढ संभवते.पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर परिणामाबाबत मंगळवारी मंत्रालयात सादरीकरण केले. अमरावती विभागात बुलडाणा, औरंगाबाद विभागात हिंगोली, कोकण विभागात ठाणे, नागपूर विभागात गोंदिया, नाशिक विभागात नंदुरबार तर पुणे विभागात सोलापूर या जिल्ह्यांत पर्यावरणीय अस्थिरता सर्वाधिक आढळली आहे. महाराष्ट्र स्टेट अ‍ॅक्शन प्लान्स आॅन क्लायमेट चेंज या डॉ. राजेंद्र पचौरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवालानुसार महाराष्ट्रात ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. नजिकच्या काळात राज्याच्या पर्जन्यमानात बदल होतील, असे दिसते. २०३० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात १.०५ ते १.४ डिग्री सेल्सिअस वाढ होईल तर २०८० सालापर्यंत तापमानातील ही वाढ २.१८ ते ३.०९ डिग्री सेल्सिअस एवढी अपेक्षित आहे. परिणामी २०३० पर्यंत अमरावती विभागाचे तापमान १.४४ ते १.६४ डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद विभागाचे तापमान १.४४ ते १.५६ डिग्री सेल्सिअस, नाशिक विभागाचे तापमान १.४ ते १.६८ डिग्री सेल्सिअस, नागपूर विभागाचे तापमान १.१८ ते १.४ डिग्री सेल्सिअस, पुणे विभागाचे तापमान १.१५ ते १.२८ डिग्री सेल्सिअस, कोकण विभागाचे तापमान १.१ ते १.२८ डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.