शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

ईडीची नोटीस पाठविणे ही आजची फॅशनच - सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 8:03 PM

Supriya Sule on ED Notice : ईडीची नोटीस पाठविणे ही एक फॅशन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

बुलडाणा: भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलल्यास लगेच ईडीची नोटीस येण्याचे प्रकार वाढले आहे. एक प्रकारे पोस्टकार्डप्रमाणे त्या मिळत आहेत, या देशात ईडीची नोटीस पाठविणे ही एक फॅशन झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा येथे स्पष्ट केले.

बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शिलेदार निष्ठेचे या कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या. त्यावेळी निवडक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी शनिवारी उपरोक्त विधान केले. बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे त्यांच्या समवेत होते.ईडीकडून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांना नोटीस पाठविण्यात येत आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्याही मध्यंतरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले होते. त्यासंदर्भाने सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त विधान केले. भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अलिकडील काळात ईडीकडून नोटीस दिल्या जात आहे. पोस्टकार्डप्रमाणेच त्या आजकाल मिळत असल्याने या नोटीस पाठविण्याची एक फॅशनच भारतात झाल्याचे त्या म्हणाले. किरीट सोमय्यांचा महाविकास आघाडी विरोधात भाजप वापर करते आहे का? या बाबत विचारणा केली असता या मुद्द्यावर आपण बोलणार नाही. सोमय्यांना आम्ही विरोधत करत नाही केले तर त्यांचे स्वागतच करू. पुण्यातही ते आले होते. त्यावेळी त्यांना आम्ही विरोध नाही तर त्यांचे स्वागतच केले होते, असे त्या म्हणाल्या.

अेाबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात त्यांना विचारले असता आमचे नेते छगनजी भुजबळ या मुद्द्यावर पाठपुरावा करत आहे. केंद्राकडून इंम्पीरिकल डाटा मिळत नसल्याबाबत त्यांना विचारले असता ही गंभीर बाब आहे. महाविकास आघाडीतर्फे गेल्या एक वर्षापासून यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. महाविकास आघाडीमधील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन या विषयासह अन्य विषयावर काम करण्याची आमची भूमिका असल्याचे त्या शेवटी म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसbuldhanaबुलडाणा