शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:52 IST

एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत.

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सचिन वाझेच्या अटकेनंतर जप्त केलेली वाहने, तसेच अन्य गोष्टींच्या तपासासाठी शुक्रवारी पुण्याची फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली. सकाळपासून जप्त केलेल्या वाहनांची तपासणी करत त्यावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. (seized vehicle's Inspection by Pune forensic team, suspicion that Vaze had 12 vehicles)एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचा समावेश आहे. याशिवाय वाझे वापरत असलेल्या २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर यांचाही समावेश आहे. या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येत असल्याचे समजते.

वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशयतपासानुसार वाझे १२ गाड्या वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. ही वाहने वाझेच्या नावावर नाहीत. ताे भागीदार किंवा गुंतवणूकदार असलेल्या तीन कंपन्यांच्या नावे आहेत. आतापर्यंत वाझेच्या ३ गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यात, २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर आहे. अन्य वाहनांचा सहभाग समोर येताच ती जप्त करण्यात येतील, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेCrime Newsगुन्हेगारीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिसMukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणMumbaiमुंबई