शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोरोनामुक्त ठिकाणी शाळांची घंटा जूनमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 6:33 AM

मुंबई-ठाण्यात ऑनलाइन शिक्षण; आरोग्याची काळजी घेत शाळांना अनुमती - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याच्या दुर्गम भागात जिथे आॅनलाईनची कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावदेखील नाही तिथे जूनपासून शाळा सुरू होतील. याशिवाय आरोग्याची काळजी घेऊन शक्य तिथे शाळा सुरू करण्यात येतील. अन्य भागात आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी याबाबतचे निर्देश दिले.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, जूनपासून शिक्षण सुरू करावे. शाळाच सुरू कराव्यात, असे नाही. आॅनलाईन, आॅफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे, त्याप्रमाणे शिक्षण सुरू करावे. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या, त्यांचे निर्जंतुकीकरण शासन स्वत:च्या खर्चाने करून देईल.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार कपिल पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत डॉ. रघुनाथ माशेलकर, औरंगाबादचे अनिरुद्ध गरुड, लातूरचे प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. अनिल पाटील आदी तज्ज्ञ उपस्थित होते.या बैठकीत विनाअनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.स्वतंत्र संगणकीय पद्धतच्जिथे कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा दुर्गम ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात.च्प्रत्यक्ष शाळा सुरू करणे अडचणीचे आहे, त्याठिकाणी इतर पर्याय तसेच आॅनलाईन शिक्षण सुरू करावे.च्गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र, स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून आॅनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस