अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:23 IST2025-06-03T17:23:14+5:302025-06-03T17:23:32+5:30
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली असून राज्य कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालयांसाठी राज्यात ठिकठिकाणी जागा उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे...
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता (महसूल विभाग)
राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता
(महसूल विभाग)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)