शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

बेटी बचाओ : मुलीच्या बापाला तीन महिने दाढी-कटिंग ‘फ्री’

By admin | Updated: January 27, 2017 08:48 IST

सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने बेटी बचाओ मोहिमेसाठी अफलातून उपक्रम शोधला असून मुलीच्या वडिलांना ३ महिने दाढी-कटिंग फ्रीमध्ये करून देण्यात येईल.

शैलेश कर्पे, ऑनलाइन लोकमत

सिन्नर (नाशिक), दि. २७ -  मुलगी झाल्यानंतर अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात. मात्र  मुलीच्या पित्याच्या आठ्या घालविण्यासाठी सिन्नरच्या नारायण संत या सलून व्यावसायिकाने एक अफलातून उपक्रम हाती घेतला आहे. मुलगी झालेल्या बापाला फ्री बॉडी मसाजसह त्यांच्या दुकानातून तीन महिने दाढी-कटिंग निशुल्क करुन दिली जाणार आहे. येथील चौदा चौक वाड्यात नारायण संत यांचे नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये संत जेन्टस् पार्लर म्हणून सलूनचे दूकान आहे. नारायण संत समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात. अनेक समजोपयोगी उपक्रम राबविण्यात ते नेहमीच पुढे असतात. संत यांनी ‘बेटी बचाव’ या उपक्रमास पाठींबा देण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक उपक्रम हाती घेतला आहे. प्रजासत्ताक दिनापासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. शहरात २६ जानेवारीपासून मुलगी झालेल्या पित्याची संत यांच्या दूकानातून तीन महिन्यांसाठी दाढी -कटिंग फ्री करुन दिली जाणार आहे. याशिवाय एक वेळाची बॉडी समाज फुकटात केली जाणार आहे. मुलगी वाचली पाहिजे आणि शिकली पाहिजे या उपक्रमाला पाठींबा देण्यासाठी सदर उपक्रम हाती घेतला असल्याचे संत यांनी सांगितले. 

अर्धांगवायू झालेल्या नागरिकाला ५० टक्के सवलतनारायण संत यांनी बेटी बचाव साठी जसा पुढाकार घेतला आहे. तसाच उपक्रम अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी स्विकारला आहे. ज्या व्यक्तीला अर्धांगवायूचा त्रास झाला असेल अशा व्यक्तींना सहकार्य करण्यासाठी संत यांनी ५० टक्के दरातून सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.