शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सावरकर मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्याच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 5:49 AM

आजच्या बैठकीत निर्णय होणार । रणजित सावरकरांनी देखील केली टीका

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील तापले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपमधील नाराजी आणखी वाढली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाºया बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसकडून सावरकर यांच्यासंदर्भात आलेले वक्तव्य व शिवसेनेने घेतलेली अतिशय मवाळ भूमिका यामुळे बहुतांश भाजप आमदार हे नाराज आहे.अगोदरच शिवसेनेने सत्तास्थापनेच्या वेळी तोडलेली युती व त्यात आता सावरकरांबाबतच्या वादामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे.राहुल गांधींचे आडनाव सावरकर नाही हे चांगले; अन्यथा तोंड काळे करावे लागेल - रणजित सावरकरमुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे नाव राहुल सावरकर नाही हे चांगले आहे, अन्यथा आम्हाला तोंड काळे करावे लागले असते, अशी टीका सावरकरांचे नातू व सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे त्यांच्या नावातून नेहरू काढल्याबद्दल आभार मानले पाहिजेत.कारण त्यांचे आधीचे नाव इंदिरा गांधी-नेहरू होते. देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूंनी व्हॉइसराय मंडळाचे सदस्य बनण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी व वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, असा आरोप त्यांनी केला.सावरकरांनी असे घृणास्पद कृत्य करण्याचा स्वप्नातदेखील विचार केला नसता. ही गुलामीची शपथ नेहरूंनी निष्ठेने निभावली होती, १५ आॅगस्ट, १९४७ला भारत स्वतंत्र झाल्यावरही ते १९५० पर्यंत किंग जॉर्जलाच भारताचा सम्राट मानत होते आणि सर्व महत्त्वपूर्ण निर्णय घेताना त्यांची अनुमती घेत होते, असा आरोप त्यांनी केला.अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीसयासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस