शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावाची दिवाळी स्वदेशी वस्तुंनीच होणार साजरी

By admin | Updated: October 7, 2016 19:13 IST

यंदाच्या दिवाळीत खरेदी करावयाच्या सर्व वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
 
चिखली (बुलडाणा), दि. 07 - उरी हल्ल्यानंतर समस्त भारतीयांकडून पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानची पाठराखण करीत चीनने भारताचे पाणी अडवल्याने चायनिज वस्तुंवर बहिष्कार टाकून चिनला धडा शिकविण्याचा सूर सोशल मिडीयावर उमटला असताना त्यास प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तालुक्यातील सावरगाव डुकरे या गावाने याबाबत ग्रामसभा घेवून चीनसह इतर विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.
विशेषत: यंदाच्या दिवाळीत खरेदी करावयाच्या सर्व वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. भारताचा कट्टर शत्रू असलेल्या व दहशतवादाला खतपाणी घालणा-या पाकिस्तानला चीन मदत करत आहे, त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार टाकण गरजेच आहे.
विशेषत: दिवाळीमध्ये खरेदी केल्या जाणा-या सामानांमध्ये ५० टक्के सामान तसेच फटाके देखील चिनी बनावटीचे असते. त्यामुळे या वस्तुंवर बहिष्कार टाकून चिनला अद्दल घडवा, असे आवाहन सोशल मिडीयावर करण्यात आले होते.या
आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्यक्ष कृतीतून चिनी बनावटीच्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्यासाठी तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील ग्रामस्थ सरसावले असून २ आॅक्टोबर रोजी सरपंच राजीव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेजराव वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत रंजीत जाधव यांनी चायनिज व विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव मांडला असता शिवानंद पाटील यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्व सदस्य व ग्रामस्थांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे. यामध्ये सर्व ग्रामस्थांनी चीन व विदेशी उत्पादने खरेदी करू नये, तसेच ज्या वस्तुंवर मेड इन पी.आर.सी. (पिपल्स रिपब्लीक आॅफ चायना) असे लिहलेले असेल अशी वस्तु खरेदी करू नये व वापरू नये. विशेषत: यंदाच्या दिवाळीत पणती, मेनबत्ती, आकाश दिवे, टॉर्च,
लाईटींग, ईलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर वस्तु या देशी बनावटीच्याच खरेदी कराव्यात व स्वदेशी वस्तुपेक्षा कितीही स्वस्तात चिनी वस्तु मिळाल्यातरी त्याचा बहिष्कार करून पाकिस्तानला साथ देणा-या चिनला धडा शिकविण्यासाठी हा ठराव घेण्यात आला आहे. सोबतच पाकिस्तानला मदत करणा-या चीनची अर्थव्यवस्था ढासळवण्यासाठी देशवासियांना चीननिर्मित वस्तू खरेदी करू नये असे आवाहन देखील सावरगाव डुकरे वासीयांनी केले आहे.