शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

साठे महामंडळातील घोटाळा २५० कोटींहून अधिक!

By admin | Updated: May 16, 2015 03:09 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची ८० कोटी रुपयांची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गडप केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने

यदु जोशी, मुंबईसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची ८० कोटी रुपयांची रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गडप केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर समाजकल्याण खात्यात एकच खळबळ उडाली. हा घोटाळा सुमारे २५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.या महामंडळातील घोटाळ्यांची अधिक चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम महामंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात अनेक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर कदम यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहेत. कोणतीही जाहिरात, मुलाखती, लेखी परीक्षा न घेता या महामंडळात ७३ जणांची एकाच दिवशी भरती करण्यात आली. त्यांना तत्काळ नियुक्तीचे पत्र देऊन प्रत्येकाला २० लाख रुपयांचे गृहकर्ज देऊन त्यातील प्रत्येकी १५ लाख रुपये नोकरी देण्यासाठीची रक्कम म्हणून उकळण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही रक्कम एकूण साडेआठ कोटी रुपये होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर राज्यभरात टीकेचे सूर उमटले होते.