साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 05:33 PM2019-09-14T17:33:00+5:302019-09-15T11:41:27+5:30

उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे.

Satara's political situation: Shivendrasinghraje, Ramraje in trap | साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

Next

- रवींद्र देशमुख

मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आजअखेर भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. हो, नाही, हो नाही करत उदयनराजे यांनी दिल्लीत भाजपचा झेंडा हाती घेतली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसलाच आहे. तर भाजपमध्ये गेलेले आणि भाजपच्या मार्गावर असलेल्या साताऱ्यातील नेत्यांना उदयनराजेंच्या निर्णयाने अडचण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे आणि विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी उघड उघड उदनयराजे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. तसेच उदनयराजे यांच्याविरुद्ध काम करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात जावून शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्या समजूत काढली होती. तसेच दोघांनाही उदयनराजे यांच्या विजयासाठी काम करण्यास तयार केले होते.

शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळी शांत झाली होती. त्याचा लाभ उदयनराजे यांनाच झाला. उदयनराजे यांनी विजय मिळवला. साताऱ्यात विजय झाला असला तरी देशात भाजपचा झालेला मोठा विजय विरोधकांना धडकी भरवणाराच होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतरही साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंह राजे आणि रामराजे यांच्यात अंतर्गत कलह नव्याने सुरू झाला. यातून बाहेर पडण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. राष्ट्रवादी सोडण्यासाठी उभय नेत्यांकडे उदयनराजे हे एकमेव कारण होते.

दरम्यान उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. एकूणच साताऱ्यातील राजकीय स्थिती, 'सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली' अशीच काहीशी झाली आहे.

Web Title: Satara's political situation: Shivendrasinghraje, Ramraje in trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.