शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

Satara Bus Accident: ग्रामस्थ धावले मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 03:06 IST

महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात पोलादपूरपासून २२ कि.मी. अंतरावरील दाभीळ या गावी बस दरीत कोसळल्याचे पहिले वृत्त आल्यानंतर पोलादपूरजवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले.

- प्रकाश कदमपोलादपूर : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात पोलादपूरपासून २२ कि.मी. अंतरावरील दाभीळ या गावी बस दरीत कोसळल्याचे पहिले वृत्त आल्यानंतर पोलादपूरजवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. पण पावसामुळे या ग्रामस्थांच्या बचावकार्यात अडथळे येत होते.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील राम ढवले, दीपक ढवले, मृणाल उतेकर, विक्र ांत जाधव, सचिन डोईफोडे, बाबू ढवले, किसन ढवले, बबन उतेकर, दीपक उतेकर, रमेश मोरे आदी सुमारे ३० ते ४० जण घटनास्थळी तत्काळ पोहोचले. रस्त्यावरून काहीच दिसत नसल्याने या ग्रामस्थांपैकी १० ते १२ जण सुमारे ६०० फूट खोल दरीत उतरले.चुराडा झालेली बस आणि छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह पाहून त्यांचा थरकापचउडाला. अशातही ज्यांना तत्काळ वैद्यकीय सेवा देणे गरजेचे आहे, अशांना त्यांनी उचलून दरीतून वर आणण्याचा प्रयत्न सुरू केला; परंतु त्यास पावसामुळे यश आले नाही.- महाबळेश्वर अ‍ॅडव्हेंचर्स आणि सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर या दोन गिर्यारोहण संस्थेचे ट्रेकर्स तेथे पोहोचले. ग्रामस्थांनी त्यांना माहिती दिली आणि ट्रेकर्सनी दोर आणि अन्य गिर्यारोहण साहित्यासह दरीत उतरून रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. या अपघाताचे वृत्त महाडमध्ये पोहोचताच महाडमधील सिस्केप, सह्याद्री गिरीभ्रमण आणि कोकणकडा गिर्यारोहण संस्थेचे डॉ. राहुल वारंगे, मोहन वडके, अमोल वारंगे, प्रशांत भूतकर, चिंतन वैष्णव, योगेश गुरव, सौरभ शेठ, चिराग मेथा, अर्णव शेठ, आकाश भूतकर, प्रणव कुलकर्णी या ट्रेकर्सनी आपल्या साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेतली आणि रेस्क्यू आॅपरेशनमध्ये सहभागी झाले.- त्याच सुमारास खेड येथील ट्रेकर्स पोहोचले आणि रेस्क्यू आॅपरेशन अधिक गतिमान झाले. पोलादपूर येथील यंगब्लड अ‍ॅडव्हेंचर्सचे ट्रेकर्सदेखील घटनास्थळी पोहोचून मदत कार्यात सक्रि य सहभागी झाले. पोलादपूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी सरकारी यंत्रणांना सत्वर माहिती दिली. तब्बल १८ शासकीय व खासगी रु ग्णवाहिका, अग्निशमन दले, पोलीस यांनी रेस्क्यू आॅपरेशनसाठी आवश्यक ती कार्यवाही केली.१७ मृतदेह काढलेरेस्क्यू आॅपरेशनच्या वेळी कोणीही कोणाला आदेश देत नव्हते, फक्त जीव वाचविण्यासाठी काम करत होते. बसमधील प्रकाश सावंत-देसाई हे वाचले असल्याचे कळल्यावर आणि त्यांना भेटल्यावर या सर्व ट्रेकर्सना समाधान वाटले. तर संध्याकाळपर्यंत १७ मृतदेह दरीतून वर आणण्यात सर्व ट्रेकर्सना यश आले असून यातील तिघांची ओळख पटलेली नाही. संध्याकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. उर्वरित शोधकार्यातही हे सर्व ट्रेकर्स सहभागी होणार आहेत....यांचा शोध सुरू१. सुयश बाळ२. संदीप झगडे३. दत्ताराम धायगुडे४. संदीप सुर्वे५. संदीप भोसले६. जयंत चौगुले७. राजेश बंडबे८. संतोष जळगावकर९. सुनील साठले१०. रविकिरण साळवी११. रितेश जाधव१२. हेमंत सुर्वे१३. राजेश सावंत१४. रोशन तबीब१५. किशोर चौगुले१६. एस. आर. शिंदे१७. सावंत(फोंडाघाट रिसर्च सेंटर)१८. संदीप सुवरे१९. गोरक्षनाथ तोंडे

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघात